Languages

  Download App

News

News

दि. १३ मार्च २०२५
शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्‍या अंतर्गत नव्याने उभारलेल्या सर्व सुविधायुक्त शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध खेळांच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानांसह स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, टेबलटेनिस हॉल आणि कॅरम हॉल विकसित करण्यात आले आहेत.
हुताशनी पौर्णिमेच्या (होळी) निमित्ताने या क्रीडा सुविधांचा लोकार्पण सोहळा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळ्याला संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री विश्वनाथ बजाज, श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गंगाधर वरघुडे, श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री औताडे तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
याशिवाय, संस्थानच्या बांधकाम विभागाचे अभियंते, न्याती कन्स्ट्रक्शन व शानदार कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नव्या क्रीडा सुविधांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिध्द करता येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Recent News