Languages

   Download App

News

News

*श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डी*

  नवनीत पब्लिकेशन्स आयोजित चित्रकला स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्याचे यश

नवनीत पब्लिकेशन मुंबई यांचे द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल,(प्राथमिक विभागात)  दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या एकूण 878 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला व सुंदर अशा चित्रकृती रंगवत भरघोस बक्षीस जिंकले या स्पर्धेमध्ये एकूण तीन गटात स्पर्धेचे आयोजन नवनीत पब्लिकेशन द्वारे करण्यात आले होते ग्रुप  'ए' इयत्ता पहिली ते तिसरी ग्रुप  'बी' इयत्ता चौथी ते सहावी व ग्रुप 'सी' इयत्ता सातवी ते दहावी यामध्ये अनुक्रमे ग्रुप ए मधून मोशीरा इरफान शेख इयत्ता पहिली ब, अवनी शिवाजी जगताप इयत्ता पहिली क, ज्ञानदा गजानन देवगुने  इयत्ता दुसरी  अ,आरोही सागर तुरकणे इयत्ता दुसरी अ,आराध्या विठ्ठल साबळे इयत्ता दुसरी ड, लायबा आदम सय्यद इयत्ता दुसरी  इ, संस्कृती महेश सर्वर  इयत्ता तिसरी अ, जरीन अब्दुल शेख इयत्ता तिसरी क, मशीरा खलील पठाण इयत्ता तिसरी ड ,याप्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाली तर ग्रुप बी इयत्ता चौथी ते सहावी मधून अनुक्रमे देवांश विजय रेवगडे इयत्ता चौथी इ, पूर्वी राहुल मेहर इयत्ता चौथी ब, विजया गणेश धरम इयत्ता चौथी ब , साईशा सुजित वायखंडे इयत्ता चौथी ड , अफिफा मन्सूर सय्यद इयत्ता पाचवी अ, चिरायू नंदकुमार तुरक णे इयत्ता पाचवी क, आराध्या वैभव धरम इयत्ता पाचवी ड, चैतन्य सुयोग वाणी इयत्ता सहावी अ , प्रणिता निलेश बिडवे इयत्ता सहावी क , अक्षदा संदीप गोरडे सहावी ड, याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादित केले तर ग्रुप सी इयत्ता सातवी ते दहावी मधून जुवेरिया साबीर मुल्ला इयत्ता सातवी क, आणि यश शंकर तुपे इयत्ता सातवी ड, या सर्व विद्यार्थ्यांना नवनीत पब्लिकेशन मुंबई यांचे तर्फे सन्मानित करून बक्षीस वाटप करण्यात आले. यासाठी श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कला अध्यापक श्री.हेमंत गीते, मुख्‍याध्‍यापिका श्रीमती शिल्पा रमेश पुजारी, प्राचार्य श्री.आसिफ तांबोळी तसेच शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री.विश्‍वनाथ बजाज यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करणेकामी शालेय स्पर्धा समिती च्‍या श्रीमती संगीता भोसले,कविता बेलदार, ज्योती बोधक, विजय हाटकर, नादिया शेख, रेश्मा भांगरे, रेश्मा त्रिभुवन व सर्व अध्‍यापकांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी चे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.भिमराज दराडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा. प्र. से.) यांनी अभिनंदन केले.

Recent News