Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
योग प्रशिक्षक योगाचार्य श्री. मनिष सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी “दररोज योगाभ्यास करणार” अशी शपथ घेत योगदिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. प्रशासकीय अधिकारी श्री. विश्वनाथ बजाज, प्राचार्य श्री. आसिफ तांबोळी, मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा पुजारी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेत योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला.
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायक ठरला.

Recent News