प्रेस नोट
श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे MHT-CET क्रॅश कोर्स सुरू
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचालित श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथे MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या क्रॅश कोर्समध्ये आत्मा मलिक शैक्षणिक संकुल येथील तज्ज्ञ प्राध्यापक आणि विषय विशेषज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः MHT-CET परीक्षेकरीता महत्त्वाचे असणा-या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांवर भर देण्यात येणार आहे.
सदर कोर्ससाठी विद्यार्थ्यांकडून ५०% शुल्क आकारले जाणार असून उर्वरित ५०% शुल्क श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थे मार्फत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
कोर्सची वैशिष्ट्ये:
• तज्ञ प्राध्यापकांद्वारे सखोल मार्गदर्शन
• परीक्षेच्या स्वरूपानुसार टेस्ट सिरीज आणि मोफत अभ्यास साहित्य
• स्मार्ट क्लासरूम आणि ऑनलाइन सुविधा
• अल्प शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण
• व्यवस्थित अभ्यासक्रम आणि वेळापत्रक
"संस्थानचे उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे." असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. तसेच या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेत उत्तम गुण मिळवून भविष्य घडवण्याची संधी मिळेल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.