साईभक्त श्री रवि नारायण करगळ बंधु, रा.चव्हाणवाडी (नारायणबाग) ता. शिरूर जि. पुणे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी ३ हजार ५०० किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले असल्याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. आज मंगळवार दिनांक २७ मे २०२५ रोजी संस्थानच्या साई प्रसादालयात साईभक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला आहे.