Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या शुभ मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित सन २०२७ च्या श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते श्री साई सभागृहात संपन्न झाले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, प्रकाशने विभागाचे अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सन २०२७ ची श्री साई दैनंदिनी विशेष रचनेत तयार करण्यात आली असून, तिच्यामध्ये समाविष्ट क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर श्री साईबाबा मंदिर तसेच संस्थानच्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ पाहता येणार आहेत. यामध्ये मोठ्या आकारातील दैनंदिनी मराठी/इंग्रजी, हिंदी/इंग्रजी, तेलुगू/इंग्रजी, तमिळ/इंग्रजी अशा एकत्रित स्वरूपातील भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय लहान आकारातील दैनंदिनी, वॉल कॅलेंडर, टेबल कॅलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

संस्थानच्या प्रकाशनांची विक्री गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून मंदिर परिसरातील पुस्तक विक्री केंद्रावर सुरू होणार आहे. दैनंदिनी व दिनदर्शिकांचे दर पुढीलप्रमाणे आहेत :

मोठ्या आकारातील श्री साई दैनंदिनी – ₹ ९०

लहान आकारातील श्री साई दैनंदिनी – ₹ २०

एक पानाची दिनदर्शिका – ₹ २०

कार्यालयीन वॉल कॅलेंडर – ₹ ३०

टेबल कॅलेंडर – ₹ ४५

कार कॅलेंडर – ₹ १०

लहान टेबल कॅलेंडर – ₹ ७०

डिलक्स वॉल कॅलेंडर – ₹ २३०

साईभक्तांना ही प्रकाशने ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी online.sai.org.in या संकेतस्थळावरून नोंदणी करून पोस्टल शुल्कासह आवश्यक रक्कम भरता येईल. त्यानंतर दैनंदिनी व दिनदर्शिका पोस्टाद्वारे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

संस्थानच्या विविध प्रकाशनांची अधिक माहिती www.sai.org.in आणि online.sai.org.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Recent News