Languages

  Download App

श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला भव्य सुरुवात

श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला भव्य सुरुवात

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोमवार दिनांक ०५ ऑगस्‍ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्‍ट २०२४ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे रथातुन श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला भव्य सुरुवात
Monday, August 5, 2024 - 08:45