श्री साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ
आज दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांसाठी गुरुस्थानजवळील उदी-प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्रसदालयाचे विभागप्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते.
आज सकाळी काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे दर्शन घेतलेल्या साईभक्तांना मोफत प्रसाद भोजन व नाश्ता कुपन्सचे वाटप करण्यात आले. हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल. प्रवेशावेळी कुपन्स जमा करून घेतली जातील.
तसेच नाष्टा पाकिटांकरीताचे असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकीट काऊंटरवर सशुल्क नाश्ता पाकीट वितरित केले जाईल.
संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साईभक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुभूती मिळेल.