Languages

  Download App

मोफत नेत्र तपासणी शिबीर

मोफत नेत्र तपासणी शिबीर

श्री साईनाथ रुग्‍णालय, शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी , शंभुराजे प्रतिष्‍ठान शिर्डी शहर व  गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबीर रविवार दि. १२/०५/२०२४ रोजी सकाळी १० ते सांयकाळी ०५ वा. पर्यंत या वेळेत आयोजीत केलेले आहे. या प्रसंगी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर, भा.प्र.से ,उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षीका, डॉ.मैथिली पितांबरे, गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांचे डॉ.प्रकाश गंगवानी  हे उपस्थित राहणार आहे. शिबीर यशस्‍वी व्‍हावे याकरीता शंभुराजे प्रतिष्‍ठान शिर्डी शहरचे सर्वपदाधिकारी व श्री साईनाथ रुग्‍णालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहे. 
या शिबीरात गिरीष ऑप्‍टीक्‍स मुंबई व श्री.साईनाथ रुग्‍णालय येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्‍टांराची टीम  रुग्‍णांची तपासणी करुन त्‍यांचे निदान करुन गरजु १००० रुग्‍णांना मोफत चष्‍मे वाटप करणार आहे.
तरी या शिबीराचा जास्‍तीत जास्‍त गरजु रुग्‍णांनी लाभ घ्‍यावा असे आव्‍हान श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडलीकर, भा.प्र.से यांनी केले आहे.

Undefined
मोफत नेत्र तपासणी शिबीर
Wednesday, May 8, 2024 - 19:00