आज रविवार दि.१२/०५/२०२४ श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी, शंभुराजे प्रतिष्ठान शिर्डी शहर व गिरीष ऑप्टीक्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर सकाळी १० ते सांयकाळी ०५ वा. या वेळेत पार पडले शिबिराचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षीका, डॉ.मैथिली पितांबरे, गिरीष ऑप्टीक्स, मुंबई यांचे प्रकाश गंगवाणी साईनाथ रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ. अजित पाटील, डॉ. अनघा विखे, आधीसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद संस्थानचे प्र. कामगार अधिकारी श्री रवींद्र नवले तसेच रुग्णालयातील सर्व परिचारिका व कर्मचारी यांच्यासह शंभुराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, अशाच प्रकारच्या शिबिरांचं आयोजन यापुढील काळात नियमित साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात येईल. जास्तीत जास्त रुग्णांना संस्थानच्या दोन्ही रुग्णालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट रुग्ण सेवा देण्याचा प्रयत्न संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी यांनी करावा असे आव्हान या प्रसंगी केले. व सर्व परिचारीका यांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या शिबीरात गिरीष ऑप्टीक्स मुंबई व श्री साईनाथ रुग्णालय येथील नेत्ररोग तज्ञ यांनी ९०० रुग्णांची तपासणी करुन त्यांचे निदान केले व गरजु ४५० रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले.