Languages

   Download App

समकालीन भक्तांच्या वारसदारांनी फोडली दहिहंडी; साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा उत्साहात समारोप.

समकालीन भक्तांच्या वारसदारांनी फोडली दहिहंडी; साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा उत्साहात समारोप.

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त बायजाबाई कोते व तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री पारेश्‍वर बाबासाहेब कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
समकालीन भक्तांच्या वारसदारांनी फोडली दहिहंडी; साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा उत्साहात समारोप.
Saturday, October 4, 2025 - 13:00