श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला - श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड!
शिर्डी : श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉस्पिटलमधील जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमने रुग्णाच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाचा ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरीत्या काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले आहे. निकिता गायकवाड राहणार कोपरगाव वय 27 ह्या रुग्णाला बाळंतपणानंतर गेल्या काही दिवसांपासून पोटात तीव्र वेदना व सूज जाणवत होती. त्या तपासणी करिता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांच्या कडे आल्या असता तपासणीनंतर त्यांच्या पोटामध्ये मोठ्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ डॉ निहार जोशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री साईबाबा हॉस्पिटल मधील वैद्यकीय टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेमध्ये श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड झाल्याचे दिसून येत असून सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याकारणाने व समाधानकारकरीत्या सुधारल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला. आधुनिक तंत्रामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक, कमी रक्तस्रावाची आणि जलद पुनर्वसनाची ठरली आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार व दिलासा मिळत आहे.रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे भूलतज्ञ डॉ निहार जोशी व जनरल सर्जरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब(भा प्र से ) यांनी कौतुक केले.
4kg Massive Tumor Successfully Removed at Shri Saibaba Hospital – A Blend of Faith, Patience, and Surgical Excellence
Shirdi | February 25, 2026
A highly complex and challenging surgery was successfully performed at Shri Saibaba Hospital. On February 13, 2026, General Surgeon Dr. Ajinkya Pangavane and his team achieved a major medical milestone by successfully removing a tumor weighing approximately 4 kilograms from a patient's abdomen.
The patient, 27-year-old Nikita Gaikwad from Kopargaon, had been experiencing severe abdominal pain and swelling following her recent childbirth. Upon consulting Dr. Ajinkya Pangavane at Shri Saibaba Hospital, Shirdi, a diagnosis revealed a massive tumor in her abdomen.
Recognizing the gravity of the situation, the medical team decided to operate immediately. Under the expert leadership of Dr. Ajinkya Pangavane and Anesthesiologist Dr. Nihar Joshi, the surgical team executed the procedure with high precision. This successful outcome is being hailed as a perfect blend of "Shraddha" (Faith), "Saburi" (Patience), and surgical expertise.
The patient is now stable and recovering satisfactorily, leading to her recent discharge. Thanks to modern medical technology, the surgery involved minimal blood loss and ensured a faster recovery.
Mr. Goraksha Gadilkar (IAS), CEO of the Shri Saibaba Sansthan Trust, lauded Dr. Pangavane, Dr. Joshi, and the entire staff of the General Surgery department for their dedication. The patient's family expressed their heartfelt gratitude to the doctors and the hospital for providing a new lease on life.
श्री साईबाबा अस्पताल में निकाला गया 4 किलो का विशाल ट्यूमर – श्रद्धा, सबुरी और सर्जरी कौशल का अद्भुत संगम
शिर्डी | 25 फरवरी, 2026
श्री साईबाबा अस्पताल में एक अत्यंत जटिल और चुनौतीपूर्ण सर्जरी को सफलतापूर्वक अंजाम दिया गया। 13 फरवरी 2026 को अस्पताल के जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे और उनकी टीम ने एक मरीज के पेट से 4 किलो वजन का ट्यूमर निकालकर बड़ी चिकित्सा सफलता हासिल की है।
कोपरगांव की रहने वाली 27 वर्षीय मरीज निकिता गायकवाड़ को प्रसव (delivery) के बाद से पेट में तेज दर्द और सूजन की शिकायत थी। जब वे जांच के लिए श्री साईबाबा अस्पताल पहुंचीं, तो डॉ. अजिंक्य पानगव्हाणे ने उनके पेट में एक विशाल ट्यूमर होने की पुष्टि की।
स्थिति की गंभीरता को देखते हुए तत्काल ऑपरेशन का निर्णय लिया गया। डॉ. अजिंक्य पानगव्हाणे और एनेस्थेटिस्ट डॉ. निहार जोशी के कुशल नेतृत्व में चिकित्सा टीम ने इस सर्जरी को अत्यंत सटीकता के साथ पूरा किया। वर्तमान में मरीज की स्थिति पूरी तरह स्थिर है और स्वास्थ्य में सुधार को देखते हुए उन्हें अस्पताल से छुट्टी (discharge) दे दी गई है। आधुनिक तकनीक के उपयोग से यह सर्जरी कम दर्दनाक रही और रक्तस्राव भी बहुत कम हुआ।
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (IAS) ने डॉ. पानगव्हाणे, डॉ. जोशी और जनरल सर्जरी विभाग के सभी कर्मचारियों की सराहना की है। मरीज के परिजनों ने डॉक्टरों और पूरी मेडिकल टीम का तहे दिल से आभार व्यक्त किया है।

