Languages

   Download App

IUKL वर्ल्ड केटलबेल स्पर्धेत साईबाबा संकुलाची सुवर्ण कामगिरी; ५ सुवर्णांसह जिंकली १२ पदके

IUKL वर्ल्ड केटलबेल स्पर्धेत साईबाबा संकुलाची सुवर्ण कामगिरी; ५ सुवर्णांसह

*दिल्लीतील वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप गाजवणार्‍या श्री साईबाबा संस्‍थानचे शैक्षणिक संकुलाच्या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन!*

शिर्डी:

दिल्ली येथे ५ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'IUKL वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शिर्डीच्या श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके जिंकून जागतिक स्तरावर देशाचे आणि श्री साईबाबा संस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे.

या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत यजमान भारतासह रशिया, अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, इंग्लंड, मंगोलिया, फ्रान्स, पोलंड, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर अशा एकूण १२ देशांतील ३०२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या तीव्र स्पर्धेत साईबाबा संकुलाच्या ९ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर व श्रीमती अंशु तारावत यांच्‍या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे हे दैदिप्यमान यश संपादन केले.

खेळाडूंच्या या सुवर्ण कामगिरीसोबतच संस्थानचे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी 'इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग' (IUKL) चे मानाचे पंच सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

जागतिक पातळीवर घवघवीत यश संपादन करून शिर्डीत परतलेल्या सर्व विजयी खेळाडूंचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी उत्साहात स्वागत केले. सर्व खेळाडूंनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यानंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सर्व खेळाडू व क्रीडा संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, अतुल वाघ, अविनाश कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे आदी उपस्थित होते.

Undefined
IUKL वर्ल्ड केटलबेल स्पर्धेत साईबाबा संकुलाची सुवर्ण कामगिरी; ५ सुवर्णांसह जिंकली १२ पदके
Monday, October 12, 2026 - 18:00