श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी साईनिवास अतिथीगृहासमोर (जुने प्रसादालयाचे बाजूला) टाईम दर्शन पास वितरण कक्षाचा शुभारंभ आज संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उप पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, साईभक्त अरुण आडकर,संस्थान अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जुन्या साईप्रसादालयाच्या इमारतीत दिनांक १२ डिसेंबर २०१६ पासून टाईम दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आलेली होती. तथापि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने जुन्या साईप्रसादालयाच्या जागेवर साईभक्तांकरीता अद्ययावत, वातानुकुलित नविन दर्शन रांगेचे काम सुरु करण्यात आले आहे. या अद्ययावत दर्शनरांगेकरीता जुन्या साईप्रसादालयाची इमारत पाडण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरुपात टाईम दर्शनचे काऊंटर श्रीराम पार्कींग, साईउद्यान इमारतआदी ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले असून साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री साईबाबा मंदिराजवळ साईनिवास अतिथीगृहासमोर (जुने प्रसादालयाचे बाजूला) मोफत दर्शनपास वितरण काऊंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी एकुण १६ काऊंटर्स सुरु करणेत आले असून यामध्ये जेष्ठ नागरीक, दिव्यांग, १ वर्षाचे आतील बालकांचे पालक व गरोदर महिला साईभक्तांकरीता मोफत दर्शनपाससाठी ०२ काऊंटर व सशुल्क दर्शनपाससाठी ०२ काऊंटर उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच साईउद्यान येथे जेष्ठ नागरीक, दिव्यांग, १ वर्षाचे आतील बालकांचे पालक व गरोदर महिला साईभक्तांसाठी ०२ काऊंटर उपलब्ध असणारअसून श्रीराम पार्कींग येथे सुरु असलेल्या काऊंटर्सचे जागी ०१ काऊंटर मोफत दर्शन पाससाठी उपलब्ध असणार आहे.