श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागाकरीता मायलॉन लॅब्रेाटरीज यांचेकडून एकुण ०१ कोटी १५ लाख रूपये किंमतीचे दोन अद्यावत एक्स-रे मशिन देणगी स्वरुपात प्राप्त झाले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
सदर मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रूग्णालयाच्या एक्स-रे विभागात बसविण्यात येऊन त्यांची मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सिमा मलिक यांचे हस्ते पुजा करुन उदघाटन करण्यात आले. यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते देणगीदार साईभक्त श्री राजीव मलिक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सिमा मलिक यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी मायलॉन कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र खैरे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकिय अधिक्षीक डॉ. मैथिली पितांबरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, अधिसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद, बायोमेडीकल विभागाचे इंजिनिअर राजेश वाकडे, तुषार कुटे, श्रध्दा कोते व स्टोअर किपर सुनिल निकम आदी उपस्थित होते. मायलॉन लॅब्रेाटरीज कंपनीच्या वतीने संस्थान रूग्णालयाकरीता यापुर्वी सुमारे १ कोटीहून अधिक किंमतीच्या विविध मशिनरी व अॅम्बुलन्स देणगी स्वरुपात मिळाले आहेत.
Undefined
श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागाकरीता मायलॉन लॅब्रेाटरीज यांचेकडून एकुण ०१ कोटी १५ लाख रूपये किंमतीचे दोन अद्यावत एक्स-रे मशिन देणगी स्वरुपात प्राप्त झाले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्था
Tuesday, May 14, 2024 - 14:45