Languages

  Download App

शिरडीमध्ये साईबाबांची भव्य पुण्यतिथी

शिरडीमध्ये साईबाबांची भव्य पुण्यतिथी

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०६ व्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या उत्‍सवात मंदिर व मंदिर परिसरात मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्रीसाई बालाजी” हा भव्‍य देखावा तसेच अमेरीका येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती प्र‍थीपा सतिष यांच्‍या देणगीतून  मंदिर व मंदिर परीसरात करण्‍यात आलेल्‍या आकर्षक फुलांची सजावट साईभक्‍तांसाठी लक्षवेधी ठरली.
आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्रीव्‍दारकामाईत सुरु असलेल्‍या श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. अखंड पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्थानच्‍या अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले व प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
समाधी मंदिरात सकाळी ०७.०० वाजता संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्‍यात आली. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवाचे मुख्‍य दिवशी लेंडी बाग येथे  संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्‍के, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. स्मिता भोसले यांच्‍या हस्‍ते ध्‍वज पूजन करण्‍यात आले.  सकाळी ०९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मुख्‍य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, पुजारी, कर्मचारी, यासह १० ग्रामस्‍थ व १० साईभक्‍त  सहभागी झाले होते. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.डॉ.सविता मुळे, छ.संभाजीनगर यांचे किर्तन झाले. तसेच सकाळी १०.३० वाजता संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिराचे समोरील स्‍टेजवर आराधना विधी करण्‍यात आला. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री दिपक केसरकर, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. स्मिता भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते. 
दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री साईसेवा मंडळ, वर्धा यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम,दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. सौ.माधुरी चंद्रकांत गुंजाळ, संगमनेर यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम झाला. त्‍यानंतर सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. तर सायं.०७.०० ते ०८.३० वा.श्रीमती पुजा चड्डा, दिल्‍ली द्वारा नाना वीर, शिर्डी यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम व रात्रौ ०८.३० ते १०.०० यावेळेत श्री.योगेश तपस्‍वी, कर्वे नगर, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार  असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक १२ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
तामिळनाडू राज्‍यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या सुमारे एक कोटीच्या देणगीतून  साईबाबा हॉस्पिटल येथे  बसविलेल्या ०६ नग व्हेंटिलिटर मशिनचा संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) व प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, वैद्यकिय संचालक डॉ शैलेश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात पार पडला यावेळी साईभक्ताचे कुटुंबीय उपस्थित होते.
उद्या रविवार दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी उत्‍सवाच्‍या तृतीय दिवशी (सांगता दिनी) पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपूजा व सकाळी ०७.०० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता ह.भ.प.श्री कैलास खरे, रत्‍नागिरी यांचा गोपालकाला किर्तन व दहिहंडी कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० श्री उदय दुग्‍गल, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्रीम.ललिता पांडे, जोगेश्‍वरी यांचा ‘साई स्‍वराधना’ कार्यक्रम, तसेच सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती,  सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत सक्‍सेना बंधु, दिल्‍ली यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे.  रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

Undefined
शिरडीमध्ये साईबाबांची भव्य पुण्यतिथी
Saturday, October 12, 2024 - 17:15