श्री साईनाथ रुग्णालयात अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न…
श्री. साईनाथ रुग्णालयातील नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा आज दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईनाथ रुग्णालय (२०० रुम) येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से व देणगीदार साईभक्त श्री गोविंददास दम्मानी, श्रीमती अंजु दम्मानी, यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोना दम्मानी, रचना दम्मानी, अशिष दम्मानी, कमलकुमार तापुरीया, शारदा तापुरीया, अभिषेक तापुरीया, स्नेहा तापुरीया, अमेय तापुरीया, झरना तापुरीया आदी उपस्थित होते.
देणगीदार साईभक्त श्री गोविंददास दम्मानी व श्रीमती. अंजु दम्मानी यांनी श्री साईनाथ रुग्णालयात येथे नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागासाठी सुमारे १.५ कोटी रुपये देणगी दिलेली असुन त्यातुन श्री साईनाथ रुग्णालयात नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागाचे काम पुर्ण करणेत आले.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले की श्री साईबाबा संस्थानच्या दोन्हीही हॉस्पिटलचे उद्दिष्ट हे सर्वांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मोफत व अत्यल्प दरात पुरविणे हे असुन श्री साईनाथ रुग्णालयात नाममात्र नोंदणी शुल्क घेवुन रुग्णांना मोफत उपचार केले जातात. दम्मानी परिवारासारखे दानशुर परिवारामुळे आम्हाला हे काम करताना मोठी मदत होत असते. अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागामुळे अनेक गोर गरीब रुग्णांच्या जीवनात बदल होईल. श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दम्मानी परिवाराचे आभार व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्री. संजय जोरी, वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, आर्थोपेडीक सर्जन डॉ.विशाल पटेल, डॉ. गोविंद कलाटे, डॉ.विद्या बो-हाडे, डॉ. महेंद्र नेमनाथ, डॉ. महेंद्र तांबे, डॉ.सत्यजीत निघुते, डॉ.प्रफुल्ल पोरवाल, डॉ.निर्मला गाडेकर, डॉ.पुजा सिंग, डॉ.पुनम वैष्णवी बांधकाम विभागाचे गणेश कोराटे, जनसंपर्क अधिकारी (रुग्णालये) सुरेश टोलमारे, बायोमेडीकल इंजिनिअर राजेश वाकडे, श्रद्धा कोते, तुषार कुटे प्रणाली कांबळे, अधिसेविका नजमा सय्यद, मंदा थोरात, यासह दोन्हीही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुरेश टोलमारे यांनी केले .