Languages

  Download App

News

News

श्री.साईबाबा संस्‍थान रुग्‍णालये व इंडीयन मेडीकल असोसिएशन शिर्डी राहाता यांचे वतीने  डॉक्‍टर डे कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. 
एकत्र कुटुंब पद्यतीच्‍या -हासामुळे भारतात मनोरुग्‍णांची संख्‍या वाढत आहे: डॉ.नंदकुमार पालवे   
भारतात पुर्वी एकत्रीत कुटुंब पद्यती होती त्‍यामुळे कुटुंब पुर्णपणे एकमेकांत बांधले गेले असायचे यातुन घरातील कुठलाही दुखी पीडीत मनोरुग्‍ण त्‍या एकत्रीत कुटुंब पद्यतीमुळे सांभाळला जायचा परंतु आता कुटुंबाचे विभक्‍तीकरण झाले असल्‍या कारणाने घरातील दुखी पीडीत मनोरुग्‍ण रस्‍त्‍यावर आलेले आहे यातुन मनोरुग्‍णांना सांभाळण्‍याचे काम आता स्‍वयं सेवी संस्‍थाकडे आल्‍याचे दिसत आहे. यातुनच सेवा संकल्‍प प्रतिष्‍ठाणची निर्मीती झाली आहे. पुर्वीप्रमाणे एकत्रीत कुटुंब पध्‍दती अवलंबील्‍यास समाजातील मनोरुग्‍ण, एकत्रीत कुटुंब व्‍यवस्‍था सांभाळु शकते. त्‍यामुळे मनोरुग्‍ण दुखीपिडीत रुग्‍णांचे सेवा कार्यातुन  स्‍वयसेवी संस्‍थानंची थोडयाफार प्रमाणात सुटका होईल.त्‍यामुळे मनोरुग्‍ण मुक्‍त समाजाची निर्मीती होण्‍यास मदत होईल असे प्रतिपादन रस्‍त्‍यावरील मनोरुग्‍ण दुखीपीडीत रुग्‍णांकरीता अहोरात्र काम करणारे बुलढाण जिल्‍हयातील पळसखेड सपकाळ या गावतील समाजसेवक डॉ.नंदकुमार पालवे यांनी संस्‍थान रुग्‍णालये व इंडीयन मेडीकल असोसिएशन शिर्डी राहाता यांनी आयोजीत डॉक्‍टर डे कार्यक्रमा प्रसंगी केले. डॉ.नंदकुमार पालवे हे बुलढाणा जिल्‍हयात पळसखेड सपकाळ येथे रस्‍त्‍यावरील व घराबाहेर काढलेले मनोरुग्‍ण व्‍यक्‍ती आणि विविध आजारांनी पीडीत रुग्‍णांकरीता सेवा संकल्‍प प्रतिष्‍ठाणच्‍या माध्‍यमातनु सेवा कार्य करत आहे त्‍यांनी आतापर्यंत ३०० मनोरुग्‍णांना बरे करुन त्‍यांचे  घरी पाठवले आहे तर १५० पेक्षा अधिक रुग्‍ण सेवा संकल्‍प प्रतिष्‍ठाण मध्‍ये उपचार घेत असल्‍याची माहिती त्‍यांनी याप्रसंगी दिली.       
या कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी,गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से हे होते. या प्रसंगी बोलताना त्‍यांनी शिर्डी/राहाता परिसरातील व संस्‍थानमधील डॉक्‍टरांनी डॉ.नंदकुमार पालवे यांच्‍या सेवा कार्याचा आदर्श घेवुन श्री.साईबाबांच्‍या रुग्‍णसेवेच्‍या कार्यात मोठया प्रमाणात सहभाग द्यावा जेणेकरुन  शिर्डी येथे आलेल्‍या  प्रत्‍येक दुखी पीडीत रुग्‍णांना रुग्‍ण सेवेचा लाभ देता येईल. याप्रसंगी त्‍यांचे हस्‍ते डॉ.नंदकुमार पालवे  व डॉ.आरती पालवे यांचा सत्‍कार करणेत आला. तसेच श्री.साईबाबा संस्‍थानचे रुग्‍णालयातील डॉक्‍टरांचे मनोबल वाढवणेसाठी व डॉक्‍टरांना चांगले काम करणेसाठी प्रोत्‍साहन मिळावे याकरीता श्री.साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयात चांगले काम करणारे डॉक्‍टरांचा सन्‍मान प्रातिनिधीक स्‍वरुपात करणेत आला. त्‍यात डॉ.राम नाईक, डॉ.संजय खुराणा, डॉ.संतोष सुरवसे, डॉ.महेश मिस्‍त्री, डॉ.दादासाहेब कांबळे, डॉ.प्रफुल्‍ल पोरवाल यांचा समावेश होता. या प्रसंगी श्री.साईनिर्माण शाळेतील विद्यार्थ्‍यांनी आपले स्‍वताचे हातांनी डॉक्‍टर डे चे बनवलेले ग्रिटींग कार्ड देवुन डॉक्‍टरांच्‍या सेवा कार्याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त  केली.
कार्यक्रम यशस्‍वी होणेकरीता इंडीयन मेडीकल असोसिएशनचे शिर्डी राहाता चे  सर्व पदाधिकारी व श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णांलयातील वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षीका, डॉ.मैथिली पितांबरे, जनसंपर्क अधिकारी, श्री सुरेश टोलमारे, कार्यालय अधिक्षक,  प्रमोद गोरक्ष, प्र.अधिसेविका श्रीमती नजमा सय्यद यांचे सह इतर रुग्‍णालयातील डॉक्‍टर  कर्मचारी यांची प्रयत्‍न केले. कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले, सुत्रसंचालन श्रीमती राजश्री पिंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  डॉ.रविंद्र आंत्रे यांनी मानले.

Recent News