Languages

   Download App

News

News

शिर्डी, ११ नोव्‍हेंबर २०२४: 
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतिने आज कार्तिकी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्‍यात आला. यानिमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. 
कार्तिक शु ।। ११ शके १९४६ कार्तिकी एकादशी या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री ८ ते ९ या वेळेत मंदिर कर्मचारी धर्मराज उपाडे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्‍न होईल. रात्री ०९:१५ वाजता श्रींच्‍या पालखीची शिर्डी गावातून मिरवणुक काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती संपन्‍न होईल.
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाकरीता ५२ पोते साबुदाणा, २३ पोते शेंगदाणे, ६६५ किलो तूप आणि सुमारे २००० किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला. सकाळी २४,६०० भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला.

Recent News