Languages

   Download App

News

News

श्री साईनाथ रुग्‍णालयामधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी काढला महिलेच्‍या “पोटातील गोळा!
श्रीमती.देवकी बालाजी अंगारे, रा. तेलवाडी, ता- पैठण जि. संभाजीनगर वय - ४१ वर्षीय महिलेच्‍या पोटात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जावुन ४.९ किलो वजनाची झाली. पोटात गोळयाचा जणु डोंगरच झाला. यामुळे रुग्णाच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होता. सदर रुग्‍णाने अनेक रुग्‍णालयांना भेट दिली, परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असलेमुळे रुग्‍णाने श्री साईनाथ रुग्‍णालय गाठले. अनेक वर्षांपासून या गोळयासह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून व तिच्‍या जीवीत्‍वाला होणारा संभाव्‍य धोका पाहून श्री साईनाथ रुग्‍णालयातील डॉक्‍टर शस्‍त्रक्रिया तात्‍काळ करणेस तयार झाल्‍या. रुग्‍णाला यातुन माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्‍न सतावत होता यासाठी त्‍यांनी अनेक  नामांकीत हॉस्पिटलचे उंबरठे  झिजवले. श्री साईनाथ रुग्‍णालय येथे आल्‍यानंतर डॉ.पुजा सिंह यांनी त्‍यांची संपुर्ण तपासणी करुन त्‍यांचेवर शस्‍त्रक्रिया करणेचा धाडसी  निर्णय घेतला. 
दि.०३ जुलै २०२५ रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉ.पूजा सिंह व भूलतज्ञ डॉ.महेंद्र तांबे व त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमने प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करुन रुग्‍णाच्‍या जिवीत्‍वाला कोणताही धोका न होवु देता इतक्‍या मोठया प्रमाणात वाढलेला २१ x १२ x २८ से.मी. आकाराचा व तब्बल ४.५ किलो वजनाचा भलामोठा गोळा एकाच वेळेस पुर्णपणे काढला. अशा प्रकारची अवघड, गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची  शस्‍त्रक्रिया श्री साईनाथ रुग्‍णालयामधील गायनिक विभागात प्रथमच सर्व टीमच्‍या प्रयत्‍नांमुळे यशस्‍वी पार पाडली आहे व सदरचा गोळा पुढील तपासणीकामी पाठविण्‍यात आला आहे, असे डॉ.पूजा सिंह यांनी यावेळी बोलताना सांगीतले. तसेच श्री  साईनाथ रुग्‍णालय हे केवळ श्रद्धेचे नव्‍हे तर आरोग्‍य सेवेतही  चमत्‍कार घडवणारे केंद्र ठरत असुन रुग्‍ण पुर्णपणे बरा होवुन सुखरुप पणे घरी पोहचला आहे. यामुळे रुग्‍ण व त्‍यांचे कुंटुंबांच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. ही संपुर्ण शस्‍त्रक्रिया श्री  साईनाथ रुग्‍णालयाने पुर्णपणे मोफत केली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से) उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, भिमराज दराडे, रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल, डॉ.शैलेश ओक, (से.नि). उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे आदींनी डॉ.पूजा सिंह व डॉ.महेंद्र तांबे यांच्‍यासह संपूर्ण गायनिक व ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केले.

Recent News