Languages

  Download App

News

News

श्री साईनाथ रुग्‍णालयासाठी ५१ लाख रुपयाचे थुलियम फायबर लेजर व निमो लेजर हे मशिन देणगी स्‍वरुपात प्राप्‍त .
         “ रुग्‍णसेवा हिच ईश्‍वरसेवा” या श्री साईबाबांचे शिकवणीतुनच  श्री साईबाबा संस्‍थानने श्री साईनाथ रुग्‍णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरु केले. विविध आजारावरील रुग्‍णांना येथे उपचार दिले जातात. अनेक साईभक्‍त त्‍यांचे इच्‍छेनुसार श्री साईबाबा संस्‍थानला विविध माध्‍यमातुन देणगी देत असतात.
           असेच देणगीदार साईभक्‍त श्री सजिंव गोयल रा.मोहाली पंजाब, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, लेफ्टर लाईफ सायन्‍स प्रा.लि.  यांनी  रु ३१,८०,८००/-इतक्‍या किंमतीचे  थुलियम फायबर लेजर तसेच  रु  १९,५०,०००/- इतक्‍या किमतीचे  निमो लेजर  हे मशिन असे सुमारे रु ५१ लाख रुपये किमतीचे दोन मशिन श्री साईनाथ रुग्‍णालयाला देणगी स्‍वरुपात दिले. सदर मशिनरीचे पुजन दि.२३/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करणेत आले. सदर मशिनरीमुळे रुग्‍णालयातील Vericose Vein, Piles या आजारावर तसेच Ortho Surgery,Gynac Surgery आदि विभागातील विविध आजाराने ग्रस्‍त रुग्‍णांवर अत्‍याधुनिक पद्धतीने उपचार होणेस मदत होणार आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, रुग्‍णालयातील जनरल सर्जन, डॉ.राम नाईक, डॉ.विद्या बो-हाडे, भुलतज्ञ– श्री.महेंद्र तांबे,डॉ.गोविंद कलाटे  स्‍त्री रोग तज्ञ- डॉ.महेंद्र नेमनाथ, डॉ.निर्मला गाडेकर, आर्थो सर्जन- डॉ.विशाल पटेल  कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, अधिसेविका सौ.मंदा थोरात, सिस्‍टर इन्‍चार्ज श्रीमती.नजमा सय्यद आदी उपस्थित होते. त्‍यानंतर या प्रसंगी बोलताना मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी  राज्‍य भरातुन रुग्‍णालयात येणारे गोर गरीब व गरजु रुग्‍णांना सदरील मशिनरीमुळे जास्‍तीत जास्‍त अद्यावत पद्धतीने उपचार करणेसाठी येथील सर्व वैद्यकीय कर्मचारी यांनी प्रयत्‍न करावा असे आवाहन केले. याच बरोबर देणगीदार साईभक्‍तांचे आभार माणुन रुग्‍णालयासाठी लागणा-या विविध मशिनरी साईभक्‍तांनी रुग्‍णालय प्रशासन किंवा मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेशी  संपर्क साधुन देणगी स्‍वरुपात देण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहनही केले.    
       सदर  कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक डॉ.महेंद्र तांबे,  सुत्रसंचालन सुरेश टोलमारे, आभार सौ.मंदा थोरात व प्रणाली कांबळे यांनी मानले.

Recent News