श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मा.जिल्हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्य श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले तसेच मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गंगाधर वरघुडे उपस्थित होते.