श्री साईबाबा संस्थान राबविणार सामाजिक आरोग्य शिबिरे !
महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे त्याच आवाहनला प्रतिसाद म्हणून श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे ठरवले असून या उपक्रमांतर्गत शिर्डी परिसरातील ४० गावा मध्ये ही सामाजिक आरोग्य शिबिरे संस्थान रुग्णालयांमार्फत राबविण्यात येणार आहे. यामध्ये दहेगाव, जवळके, खडकेवाके, मंजुर, अंजनापुर, काकडी, कोकमठाण, संवत्सर, वारी कान्हेगाव, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, पिंपळस, केलवड, पोहेगाव, साकुरी, नांदुखीं, को-हाळे, डो-हाळे, वाळकी, पिंपळवाडी, सावळीविहीर, निमंगाव को-हाळे, कनकुरी, रुई, पुणतांबा, रस्तापुर, वाकडी, रामपुरवाडी, जळगाव, शिंगवे, दहेगाव बोलका, भोजडे, चितळी, अस्तगाव, एकरुखे, चोळकेवाडी, मढी, गणेशनगर, शिर्डी या राहाता व कोपरगाव तालुक्यातील निवड केलेल्या चाळीस गावातील नागरिकांशी श्री साईबाबा संस्थान व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येऊन त्या गावांमध्ये सामाजिक आरोग्य शिबिरे पार पडणार आहे. सदर शिबीरामध्ये ईसीजी तपासणी, रक्त तपासणी करणेत येवुन आजाराचे निदान झालेल्या रुग्णावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातुन मोफत उपचार करणेत येणार आहे.
ही सामाजीक आरोग्य शिबीरे राबविणेकरीता श्री साईबाबा संस्थान रुग्णालयांनी फिरते वैद्यकीय आरोग्य तपासणी पथक तयार केले आहे. दि.०३ सप्टेंबर २०२४ रोजी या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या वाहनाला वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल शैलेश ओक यांनी हिरवा झेंडा दाखवून सामाजिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ केला. या प्रसंगी उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, अधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, समाजसेविका शोभा गाडेकर सोनल नागपुरे, ईडीपी मॅनेजर साईप्रसाद जोरी बायो मेडिकल वेस्ट मॅनेजर सचिन टिळेकर, कॅम्प कॉर्डिनेटर सुनील लोंढे यांच्यासह दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर, टेक्निशियन, नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते. यासाठी संस्थान रुग्णालयातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.
तरी या शिबिराच्या माध्यमातून आपली आरोग्य तपासणी शिबीराच्या दिवशी संबंधित गावातील रहिवासी नागरिकांनी करून घ्यावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.