Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांनी संस्‍थानचे प्र.मुख्

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांनी संस्‍थानचे प्र.मुख्

February 6th, 2021

शिर्डी -

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांनी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍याकडे सदर गाडीची चावी सुपूर्त केली.

यावेळी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे नासिक विभागाचे प्रमुख प्रदिप देशमुख, श्री.जे.एस.प्रसाद, संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षिरसागर, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदि उपस्थित होते. 

        श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने यापुर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, कॅम्‍पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍स यु व्‍ही ५००, एक्‍स यु व्‍ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकुण १४ वाहने देणगी स्‍वरुपात दिलेल्‍या आहेत. आज महिद्रा थार या श्रेणीतील ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची गाडी देणगी स्‍वरुपात दिली. या गाडीची संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांच्‍या हस्‍ते  विधिवत पूजा करण्‍यात आली.

Recent News