Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या साईधर्म शाळा येथे वय वर्ष ४५ पुढील जे विविध व्‍याधींनी त्रस्‍त आहे अशा व्‍यक्‍ती व वय वर्ष ६० पुढील सर्व व्‍यक्‍तींसाठी कोवीड लसिकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून या कोवीड लसिकरण केंद्राचा शुभारंभ सं

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या साईधर्म शाळा येथे वय वर्ष ४५ पुढील जे विविध व्‍याधींनी त्रस्‍त आहे अशा व्‍यक्‍ती व वय वर्ष ६० पुढील सर्व व्‍यक्‍तींसाठी कोवीड लसिकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून या कोवीड लसिकरण केंद्राचा शुभारंभ सं

March 12th, 2021

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या साईधर्म शाळा येथे वय वर्ष ४५ पुढील जे विविध व्‍याधींनी त्रस्‍त आहे अशा व्‍यक्‍ती व वय वर्ष ६० पुढील सर्व व्‍यक्‍तींसाठी कोवीड लसिकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून या कोवीड लसिकरण केंद्राचा शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, वैद्यकीय अधिकारी व परिचारक-परिचारीका व कर्मचारी उपस्थित होते.

शिर्डी व परिसरातील वय वर्ष ४५ पुढील जे मधुमेह, ब्‍लड प्रेसर, हृदय विकार आदी व्‍याधींनी त्रस्‍त आहे अशा व्‍यक्‍तींसाठी व वय वर्ष ६० पुढील सर्व व्‍यक्‍तींसाठी कोवीड लसिकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून या कोवीड लसीकरीता इच्‍छुकांनी आपली नावे या कोवीड लसिकरण केंद्रात नोंदवावी. ही लस शासनाने ठरविलेल्‍या रुपये २५० या दरात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तसेच शासनाच्‍या वतीने दररोज १०० लोकांना ही लस देण्‍यास परवानगी दिलेली आहे.

यामुळे जास्‍तीत-जास्‍त लोकांनी या कोवीड लसीकरण केंद्रात आपल्‍या नावाची आगाऊ नोंदणी करुन आपल्‍याला देण्‍यात येणा-या तारखेस व वेळेस उपस्थित राहुन लसीचा लाभ घ्‍यावा.

Recent News