श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा श्री साई सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे - सिनारे, विश्वनाथ बजाज, मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व प्रकाशने विभागाच्या प्र. अधिक्षक सुनिता सोनवणे उपस्थित होते.
सन २०२५ ची श्री साई दैनंदिनी ही विशेष डिझाईन मध्ये बनविलेली आहे या दैनंदिनीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेल्या क्यू आर कोड मध्ये मंदिर तसेच संस्थान चालवत असलेल्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
श्री साई दैनंदिनी डीलक्स सहा प्रादेशिक भाषेत असून यात मराठी, हिंदी, तेलगू,तमिल, कन्नड, गुजराती या सर्व भाषांसह इंग्रजीत उपलब्ध असून तीन प्रकारचे श्री साई दिनदर्शिका वॉल कॅलेंडर व टेबल कॅलेंडर विक्री करीता उपलब्ध आहेत. सर्व प्रकाशने साई भक्तांसाठी संस्थानचे मंदिर परिसरातील पुस्तके विक्री केंद्रावर लवकरच विक्री कामी वाजवी दरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्या साईभक्तांना श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका खरेदी करावयाच्या आहेत त्यांनी संस्थानच्या संकेतस्थळावर online.sai.org.in नोंदणी करून दैनंदिनी व दिनदर्शिका २०२५ खरेदी कामीची रक्कम पोस्टल चार्जेस सह online.sai.org.in या वेबसाईट द्वारे भरलेनंतर श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका पोस्टामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. संस्थान प्रकाशनांची विस्तृत माहिती www.sai.org.in व online.sai.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.