Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत दीक्षांत समारंभ संपन्‍न

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेतील प्रशिक्षणार्थ्‍यांची ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये कौशल्‍य विकास मंत्रालय आणि उद्योजकता महासंचालनालय, न‍वी दिल्‍ली (DGT) यांचेमार्फत घेणेत आलेल्‍या अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये मध्‍ये यशस्‍वी झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचा दीक्षांत समारंभ दि.०५ ऑक्‍टोबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्‍या हस्‍ते सन्‍मान चिन्‍ह (ट्रॉफी) व NCVT प्रमाणपत्र देवून करण्‍यात आला. या वेळी विविध ११ व्‍यवसायातुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेल्‍या तसेच संस्‍थेमध्‍ये सर्व प्रथम क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला.

या वेळी प्रशिक्षणार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना मुख्‍य अतिथी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी असे सांगितले की, सर्व विद्यार्थी हे सर्व साधारण कुटुंबातील असल्‍याने औ. प्र. संस्‍थेतून दिल्‍या जाणा-या प्रशिक्षणाच्या संधीचे सोने करुन घ्यावे.  त्‍याचप्रमाणे आपल्‍या शिक्षणाच्‍या आड आपली आर्थिक परिस्थिती कधी‍ही येता कामा नये. त्‍यावर मात करुन प्रबळ इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर प्रगतीचे सर्वोच्‍च शिखर गाठता येते. प्रशिक्षणार्थ्‍यांना अद्ययावत प्रशिक्षण घेता यावे यासाठी संस्‍थेमार्फत नवीन मशिनरी व टुल्‍स अॅण्‍ड इक्विपमेंट खरेदी करणेबाबत कार्यवाही सुरु आहे. संस्‍थेतील प्रशिक्षणार्थींना जर्मनी व जपान या भाषेचे प्रशिक्षण घेणेसाठी मुंबई, पुणे, नाशिक यासारख्‍या शहराच्‍या ठिकाणी जावे लागू नये म्‍हणून आपल्‍या संस्‍थेतच विनाशुल्‍क ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रशिक्षण देण्याची सुविधा लवकरच उपलब्‍ध करुन देणेत येणार आहे.  संस्‍थेतील प्रत्‍येक प्रशिक्षणार्थी जर्मनी तसेच जपान यासारख्‍या देशात नोकरीसाठी कसे जातील याबाबत प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले. आयटीआय मधील प्रशिक्षणार्थींना संस्‍थानमार्फत चालू असणा-या कमवा आणि शिका या योजनेचा लाभ घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करता येईल यासाठी श्री साईबाबा संस्‍थान नेहमी त्‍यांच्‍या पाठीशी असेल असेही त्‍यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची  सुरुवात  प्रमुख अतिथीचे हस्ते श्रीची पुजा व दिप प्रज्वलन करुन करणेत आली.  प्रमुख अतिथीचा परिचय तसेच सुत्रसंचालन निदेशक श्री.व्‍ही.बी. पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रमास शैक्षणिक संकुलाचे प्र‍शासकीय अधिकारी, श्री. विश्‍वनाथ बजाज,  संस्‍थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे, गट निदेशक श्री. दादा जांभुळकर, सर्व निदेशक, प्रशिक्षणार्थी तसेच त्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Recent News