Languages

  Download App

News

News

शिर्डी –

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त सकाळी ०८.१५ वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते शैक्षणिक संकुलाच्‍या क्रीडांगणावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संदीपकुमार भोसले, विश्‍वनाथ बजाज, मुख्‍य लेखाधिकारी मंगला व-हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल, डॉ.शैलेश ओक, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्‍थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

याप्रसंगी संस्‍थानच्‍या संरक्षण विभाग, फायर अॅण्‍ड सेफ्टी विभाग, सुरक्षा एजन्‍सीज, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदींनी आकर्षक परेड सादर केले. त्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शिर्डी शहरातील सर्व माध्‍यमिक शाळांमधील इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या १६ गुणवंत विद्यार्थ्‍यांना श्री.द.म.सुकथनकर मार्च २०२४ हे पारितोषिक व संस्‍थानच्‍या शैक्षणिक संकुलातील इयत्‍ता १२ वीच्‍या कला, वाणिज्‍य व विज्ञान शाखेच्‍या  परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या गुणवंत ०९ विद्यार्थ्‍यांना कै.लहानुबाई अमृतराव गोंदकर व  कै. भागचंद कोंडाजी गोंदकर पारितोषिक वाटप करण्‍यात आले. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या प्रसादालयातील कर्मचारी प्रल्‍हाद कर्डीले व रविंद्र वहाडणे यांचा राष्ट्रपती भवन येथे आचारी प्रशिक्षणाकरीता निमंत्रित केल्‍याबद्दल सत्‍कार करणेत आला. तसेच संस्‍थानचे सेवानिवृत्‍त कर्मचारी किसन काटकर यांची कन्‍या कु. सोनाली किसन काटकर यांची महाराष्‍ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्‍याबद्दल श्री गाडीलकर  यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मनोगत व्‍यक्‍त करुन स्‍वातंत्र्य दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीपर गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्‍या विद्या मंदिरचे उपाध्‍यापक वसंत वाणी व अजिंक्‍यदेव गायकवाड यांनी केले. तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी आभार व्‍यक्‍त केले.

Recent News