Languages

  Download App

News

News

श्रीरामनवमी उत्‍सवा करीता येणा-या पालख्‍यांचे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेकडून स्‍वागत.....
शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्‍सवा करिता विविध भागातून दरवर्षी मोठया प्रमाणात पालख्‍या दाखल होत असतात. यावर्षी श्रीरामनवमी उत्‍सवा करीता येणा-या पालख्‍यांचे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी सिन्‍नर येथे जावून स्‍वागत केले व पालख्‍यां सोबत पायी चालून सहभाग घेतला.  पालखीधाकरांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या यावेळी पालखीधारकांनी समाधान व्‍यक्‍त केले. 
  पालखी धारकांकरीता संस्‍थान तर्फे विविध ठिकाणी पालखी थांब्‍यांवर करण्‍यात आलेल्‍या मंडप, पिण्‍याचे पाणी, टॉयलेट व्‍हॅन, एलईडी व्‍हॅन, भजन किर्तन कार्यक्रम  इत्‍यादी व्‍यवस्‍थेची पाहणी केली तसेच तेथील            कर्मचा-यांना पालखी मध्‍ये आलेल्‍या साईभक्‍तांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सुचना दिल्‍या. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख अनिल शिंदे, वाहन विभागप्रमुख अतुल वाघ, नवनाथ मते  आदी उपस्थित होते.

Recent News