मा. ना. श्री अमित शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री मा. ना. अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. ना. मुरलीधर मोहोळ, जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, व इतर मंत्री महोदय उपस्थित होते.