Languages

   Download App

News

News

coronavirus awareness

Coronavirus Awareness

March 7th, 2020

शिर्डी - 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या कर्मचा-यांकरीता राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण दल, नवी दिल्‍लीच्‍या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरस संदर्भात मार्गदर्शन शिबीरात कमांडर श्री.ए.के.झेना व डॉ.राहुल वाघमारे यांनी उपाययोजनांची माहिती दिली.

संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व उप मुख्‍य  कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्‍यात आलेल्‍या या शिबीरास संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री सुर्यभान गमे, अशोक औटी, पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे, उप मुख्‍यअभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व विभागांचे कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

जगभरातील काही देशांमध्‍ये कोरोना व्‍हायरसची लागण झालेले रुग्‍ण आढळून आलेले असून सदर व्‍हायरसची लागण झालेले काही रुग्‍ण भारतातही आढळून आलेले आहेत. श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात. त्‍यामुळे मंदिर व मंदिर परिसरात मोठी वर्दळ होत असून कोरोना व्‍हायरस पासून होणा-या आजारा विरुध्‍द प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून खबरदारी घेणेकामी कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण दल, नवी दिल्‍ली (नॅशनल डिझास्‍टर रिस्‍पोन्‍स फोर्स (NDRF) च्‍या वतीने मंदिर परिसर गेट नं.०५ चे आतील बाजुस सकाळी ८.०० वाजता कोरोना व्‍हायरस संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते.

याप्रसंगी राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण दल, नवी दिल्‍लीच्‍या वतीने कमांडर श्री.ए.के.झेना व डॉ.राहुल वाघमारे यांनी कर्मचा-यांना मोलाचे मार्गदर्शन करुन प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून खबरदारी घेणेकामी वापरण्‍यात येणा-या प्रतिबंधात्‍मक साहित्‍यांची माहिती देवुन प्रात्‍याक्षिक दाखविले. तसेच यावेळी काही कर्मचा-यांनी कोरोना व्‍हायरस संदर्भात काही शंका उपस्थितीत केल्‍या या शंकांचे समाधान करुन या आजाराला घाबरुन न जाता आपल्‍या शरिराच्‍या व परिसराच्‍या स्‍वच्‍छतेकडे अधिक लक्ष द्यावे असे धडे कमांडर श्री.झेना व डॉ.राहुल वाघमारे यांनी कर्मचा-यांना दिले.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने कोरोना व्‍हायरस पासून होणा-या आजारा विरुध्‍द प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून संस्‍थानच्‍या दोन्‍ही रुग्‍णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्‍यात आला आहे. तसेच जनजागृती करीता प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून खबरदारी घेवायाच्‍या माहितीचे फलक मंदिर परिसर व गर्दीचे ठिकाणी लावण्‍यात आलेले आहेत. तसेच परिसरात असलेले स्‍वच्‍छता गृहे, पिण्‍याचे पाण्‍याचे ठिकाण व आवश्‍यक त्‍या ठिकाणी साईभक्‍तांना लिक्‍वीड सोपसह हात धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. आज आयोजित केलेल्‍या शिबीरातील प्रशिक्षणामुळे कोरोना व्‍हायरसबाबत व निर्मूलनासाठी विशेष माहिती मिळण्‍यास मदत झाली आहे. 

Recent News

Donation