Languages

   Download App

News

News

मोफत नेञ तपासणी व चष्‍मे वाटप शिबीराचे आयोजन

January 14th, 2020

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) व श्री गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने श्री साईनाथ रुग्‍णालयात शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी मोफत नेञ तपासणी व चष्‍मे वाटप शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वतीने वर्षभर विविध शिबीरांचे आयोजन करण्‍यात येते. यामध्‍ये मोफत मोतीबिंदू व तिरळेपणा शस्‍ञक्रिया शिबीर, महारक्‍तदान शिबीर तसेच किडनी स्‍टोन शिबीर व मोफत कृत्रिम पायरोपण आणि हातरोपण शिबीर आदी शिबीरांचा समावेश आहे. त्‍याचप्रमाणे दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) व श्री गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत नेञ तपासणी व चष्‍मे वाटप शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले असून सदर शिबीराकामी श्री गिरीष ऑप्‍टीक्‍स, मुंबई यांच्‍या सहकार्यातुन श्री साईनाथ रुग्‍णालयात श्री प्रकाश गंगवाणी व त्‍यांचे स‍हकारी मोफत नेञ तपासणी करणार असुन आवश्‍यक त्‍या रुग्‍णांना नंबरचे जवळपास ५०० चष्‍मे त्‍यांचे मार्फत मोफत देणार आहेत. तसेच श्री साईनाथ रुग्‍णालयातील नेञ विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ.मनिषा अग्रवाल, डॉ.अजित पाटील, डॉ.अनघा विखे व डॉ.प्राजक्‍ता खर्चे हे या शिबीरात सहभाग घेणार आहेत.

या शिबीरात सहभागी होण्‍याकरीता गरजु रुग्‍णांनी आपली नावे श्री साईनाथ रुग्‍णालयात नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी रुग्‍णालय चौकशी विभाग (०२४२३) २५८५५५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्‍णांनी उपचारासाठी येतानी सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड व पासपोर्ट साईज फोटो घेवुन यावे असे सांगुन जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांनी या शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.

Recent News

Donation