श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चारित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व विश्वस्त अॅड.मोहन जयकर यांनी प्रतिमा, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी विणा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित, राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील, ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.