मा. ना. शंभुराज देसाई, मंत्री, पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. आमदार अमोल खताळ, मा. आमदार विठ्ठलराव लंघे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.