Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्थानचे महत्त्वाचे आवाहन: सुरक्षा आणि सहकार्याचे विनम्र आवाहन
शिर्डी - श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे दिनांक २ मे २०२५ रोजी एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये श्री साईबाबांचे मंदिर स्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून, साई भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी, श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, दिनांक ११ मे २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत, श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल इत्यादी कोणतीही वस्तू नेण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.
सर्व साईभक्तांना या बदलांची नोंद घ्यावी आणि संस्थान व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. आपल्या सर्वांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी उचललेल्या या पावलांना आपण समजून घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
१० मे २०२५

 

Recent News