Languages

  Download App

News

News

शिर्डी, श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्‍याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भोकरदन येथील श्री. भगवान आनंद तळेकर यांचेवर साईनाथ रुग्‍णालयात यशस्‍वी नेत्र प्रत्‍यारोपन शस्‍त्रक्रिया करणेत आली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यांना स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे. या पूर्वी त्यांना एकाच डोळ्याने अंधुक दिसत होते, मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व आज डिस्चार्ज नंतर श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सत्‍कार केला यावेळी साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिक्षिका डॉ मैथिली पितांबरे, नेत्र तज्ञ डॉ सौदामिनी निघुते व अवयवदान चळवळ राबविणारे डॉ अशोक गावित्रे, रुग्‍णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, सिस्टर इन्चार्ज वाणी आदी उपस्थित होते.
श्री. तळेकर हे गेल्या काही वर्षांपासून दृष्टीदोषाने त्रस्त होते. संस्थानच्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर  सौदामिनी निघुते यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. उपचारानंतर प्रथमच स्पष्ट दृष्टी अनुभवल्याने त्यांच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्‍थानच्‍या दोन्‍ही रुग्‍णालयात रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि वैद्यकीय सेवा सातत्याने पुरवल्या जातात. अनेक रुग्णांना मोफत नेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया केल्‍या जात आहेत.
या यशस्वी उपचाराबद्दल श्री. तळेकर यांनी संस्थान आणि डॉक्टरांचे आभार मानले असून, नव्याने मिळालेल्या प्रकाशमय जीवनाचा आनंद व्यक्त केला आहे.

Recent News