आज दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी आसनगाव, जि. पालघर येथील साईभक्त श्री मिलींद पाटील यांनी श्री साईबाबा संस्थानला ११ नग व्हिलचेअर देणगी दिली असल्याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
Undefined
आसनगावचे साईभक्त श्री मिलींद पाटील यांनी श्री साईबाबा संस्थानला ११ व्हिलचेअर भेट दिली
Saturday, December 28, 2024 - 19:30