Languages

  Download App

राज्यपालांचे साईबाबांच्या चरणी नमन

राज्यपालांचे साईबाबांच्या चरणी नमन

महाराष्ट्र राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्‍णन यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा, संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य श्री.सिद्धराम सालीमठ (भा.प्र.से.), श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्‍णन यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा, संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य श्री. सिद्धराम सालीमठ (भा.प्र.से.) यांनी सत्‍कार केला यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

Undefined
राज्यपालांचे साईबाबांच्या चरणी नमन
Thursday, September 19, 2024 - 12:00