शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संदीपकुमार भोसले, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला व-हाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल, डॉ.शैलेश ओक, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, संस्थान कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. गाडीलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याची घोषणा केली. तसेच साई भक्तांसाठी सुरू केलेल्या नवीन उपक्रमांची व सेवा सुविधांची माहिती दिली .
त्यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्या विद्या मंदिरचे उपाध्यापक वसंत वाणी व अजिंक्यदेव गायकवाड यांनी केले. तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी आभार व्यक्त केले.