श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिमा, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी विणा व विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके यांनी पोथी घेवून सहभाग घेतला. यावेळी अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, विश्वस्त अॅड.मोहन जयकर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, सौ.नलिनी हावरे, सौ.सरस्वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.