Languages

   Download App

News

News

श्री साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे. याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक श्री साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात.
आज ठाणे, मुंबई येथील हीर रिअल्टी व्हेंचर प्रा. लि. चे साईभक्त श्री धरम कटारिया यांनी श्री साईचरणी ६६० ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले. या सुवर्ण ताटाची किंमत ७४ लाख ४९ हजार ३९३ असून ते श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त श्री धरम कटारिया यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Recent News