Languages

   Download App

News

News

*श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार*
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्या वतीने दि. ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव  भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विविध वाढीव उपाययोजना व विशेष सेवा सुविधा राबविण्यात येत आहेत. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर, भाविकांना विनाअडथळा व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. १० जुलै रोजी ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे. ही सेवा फक्त गुरुवार दि. १० जुलै २०२५ या दिवशीच बंद राहणार असून, इतर दिवस सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहील.
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांच्यातर्फे सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Recent News