श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.