Languages

  Download App

शिर्डीत मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर

शिर्डीत मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर

शिर्डी
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई)  जयपुर  यांचे संयुक्‍त विद्यमाने ०५ वर्षानंतर  पुन्‍हा एकदा मोफत  कृत्रीम पायरोपन  (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. 
दिनांक दि.२६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्‍यान श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम)  येथे मोफत  कृत्रीम पायरोपन  (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्‍यांगासाठी साहित्‍य वाटपाचे आयोजन करणेत आले असून यामध्‍ये गरजु व लाभार्थी दिव्‍यांग व्‍यक्‍तींची तपासणी करणेत येऊन आवश्‍यकतेनुसार दिव्‍यांग  व्‍यक्‍तीच्‍या पायाचे माप घेऊन त्‍या मापाचे कृत्रीम पाय रोपण करण्‍यात येणार आहे. नवीन पाय बसविणे बरोबर जुन्‍या कृत्रीम पायाची दुरुस्‍ती देखील सदर शिबीरामध्‍ये मोफत करण्‍यात येईल. याचबरोबर दिव्‍यांगाकरीता आवश्‍यक साहित्‍याचे वाटप देखील शिबीर कालावधीत करण्‍यात येणार आहे.  सदर शिबीरात    येणा-या सर्व शिबीरार्थींना श्री साईबाबा संस्‍थान मार्फत राहण्‍याची व दोन वेळच्‍या जेवणाची मोफत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. या शिबीरात भाग घेणेसाठी श्री साईनाथ रुग्‍णालय, शिर्डी येथे नाव नोंदणी सुरु असून दुरध्‍वनी क्र. ०२४२३-२५८५५५ वर संपर्क साधुनही नावनोंदणी करता येईल तसेच शिबीरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्‍य ओळखपत्र आणि ०२ पासपोर्ट साईज  फोटो  घेवुन यावे.
तरी जास्‍तीत जास्‍त दिव्‍यांग गरजू व्‍यक्‍तींनी या शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे संस्‍थापक पदमभुषण डी.आर.मेहता यांनी केलेले आहे.

Undefined
शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर आणि भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती यांच्या संयुक्त उपक्रमातून मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोणासाठी: गरजू दिव्यांग व्यक्तींसाठी
Tuesday, September 3, 2024 - 18:00