Languages

   Download App

शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ

शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे रथातुन श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा तर प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र. कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ
Friday, July 25, 2025 - 08:30