श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बीण द्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया संपन्न
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे बिन टाक्याची इंडॉस्कोपी स्पाइन सर्जरी न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या न्यूरो सर्जरी टीमने केली.
दुर्गादास राठोड रा. शिर्डी जिम मध्ये व्यायाम करत असताना त्यावेळी त्यांनी भारी वजन उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पाठीच्या मणक्याची गादी सरकली यातून त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या या वेदने पोटी त्यांना डावा पाय पूर्ण तोडून टाकावा असे वाटत होते अशा असह्य वेदना होत असताना त्यांनी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांची भेट घेतली डॉक्टरांनी त्यांना सर्जरी करावी असे सांगितले परंतु मणक्याचे ऑपरेशन करणे हे त्यांना भीतीदायक वाटत होते त्यांनी डॉक्टरांना विनंती करून ऑपरेशन मध्ये कमीत कमी जखम कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले डॉ. प्रसाद उंबरकर यांनी यासाठी साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बीण द्वारे सदर रुग्णाचे ऑपरेशन करवायचे ठरवले यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यातून त्यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच अशा प्रकारची बिन टाक्याची शस्त्रक्रिया दुर्बिन द्वारे संपन्न केली शस्त्रक्रिया संपन्न झाल्यानंतर रुग्ण अगदी भूलेतून बाहेर आल्या आल्या चालायला लागला त्याची असह्य वेदनेतून सुटका झाली त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करून डॉक्टरांचे व श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटल मधील न्यूरो ओटी टीमचे मनःपूर्वक आभार मानले सदरील सर्जरी ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आली या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरो ओटी टीमचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा. प्र. से., उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींनी अभिनंदन केले.