श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून श्री साईबाबा संस्थानचे तत्कालीन संरक्षण अधिकारी श्री आण्णासाहेब बन्सी परदेशी यांनी त्यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही शासकिय सेवेत नोकरी मिळाल्यामुळे श्री साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ अर्पण केला असून त्यांची एकूण किंमत रुपये ०३ लाख ३१ हजार ८४५ इतकी आहे.
सदरची देणगी प्राप्त झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
Undefined
सोन्याचा त्रिशूळ: साईबाबांच्या चरणी भक्ताची अनोखी भेट
Saturday, August 16, 2025 - 15:00