Languages

   Download App

News

News

 श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक

 श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक

April 10th, 2022

१.      श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. संस्‍थानचे विश्‍वस्‍त सुरेश वाबळे यांनी वीणा, विश्‍वस्‍त सचिन गुजर व विश्‍वस्‍त महेंद्र शेळके यांनी श्रींची प्रतिमा व विश्‍वस्‍त श्रीमती अनुराधाताई आदिक यांनी पोथी घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, जयवंतराव जाधव, डॉ.एकनाथ गोंदकर, प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

२.      श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी कावडी पुजन करताना संस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त श्रीमती अनुराधाताई आदिक व सौ.शोभाताई गोंदकर.

३.      श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिरात श्रींची विधीवत पाद्यपुजा करताना संस्‍थानचे उपाध्‍यक्ष अॅड.जगदिश सावंत व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.जान्‍हवीताई सावंत. यावेळी विश्‍वस्‍त रराहुल कनाल, सचिन गुजर व अॅड.सहास आहेर उपस्थित होते.

४.      श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याची पुजा करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, उपाध्‍यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, रराहुल कनाल, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके व डॉ.एकनाथ गोंदकर.

५.      श्रीरामनवमी उत्‍साच्‍या मुख्‍य दिवशी लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे पुजन करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, उपाध्‍यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, रराहुल कनाल, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके व डॉ.एकनाथ गोंदकर.

Recent News

Donation