Languages

   Download App

News

News

कोव्‍हीड १९ ओमीक्रॉन व्‍हेरिएंटच्‍या संभाव्‍य तिस-या लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर करावयाच्‍या उपाय-योजन

कोव्‍हीड १९ ओमीक्रॉन व्‍हेरिएंटच्‍या संभाव्‍य तिस-या लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर करावयाच्‍या उपाय-योजनां

January 6th, 2022

कोव्‍हीड १९ ओमीक्रॉन व्‍हेरिएंटच्‍या संभाव्‍य तिस-या लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर करावयाच्‍या उपाय-योजनांकरीता नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेल्‍या आढावा बैठकीत केलेल्‍या सुचनांच्‍या अनुषंगाने कोव्‍हीड रूग्‍णांकरीता व्‍हेंटीलेटर, लिक्‍वीड ऑक्‍सीजन प्‍लॅंट व Dura cylinder तसेच इतर वैद्यकीय साहीत्‍यांची आवश्‍यकता असुन या साहित्‍यांकरीता देणगी देवु इच्‍छीणा-या साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल व जनसंपर्क कार्यालय यांच्‍याशी संपर्क करावा, असे आवाहान संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या सभागृहात नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्‍हायरसच्‍या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर करावयाच्‍या उपाय-योजनांकरीता आढावा बैठक आयो‍जित करण्‍यात आलेली होती. यावेळी सर्व प्रथम कोरोना विषयक कामकाजाचा आढावा घेवुन विभागीय महसूल आयुक्‍त श्री.गमे यांनी प्रति दिवस ५ हजार व्‍यक्‍तींपर्यंत आरटी-पीसीआर तपासणी क्षमता वाढविणे, जीनोम सीक्‍वेसिंग लॅब उभारणी करणे, दोन लिक्‍वीड मेडीकल ऑक्‍सीजन प्‍लॅट भाडेतत्‍वावर घेणे, साईआश्रम फेज २ येथे कोव्‍हीड रूग्‍णांकरीता सुमारे ३०० खाटांचे ऑक्‍सीजन बेड वाढविणे, Dura cylinder, दोन लिक्‍वीड ऑक्‍सीजन प्‍लॅंट, व्‍हेंटीलेटर तसेच वैद्यकीय साहित्‍य व आवश्‍यक पायाभूत सुविधा देणगी स्‍वरूपात उपलब्‍ध करावे. तसेच यापूढे श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्‍णालय हे दोन्‍ही नॉनकोव्‍हीड रूग्‍णालय म्‍हणून कार्यरत ठेवुन संभाव्‍य तिस-या लाटेसाठी कोव्‍हीड हॉस्पिटल साईआश्रम फेज २ (साईधर्मशाळा) येथे सुरू करावे, अशा सुचना केल्‍या होत्‍या.

त्‍यानुसार साईआश्रम फेज २ (साईधर्मशाळा) येथे संभाव्‍य तिस-या लाटेसाठी कोव्‍हीड हॉस्पिटल उभारणीचे काम सुरु असुन याकामी आवश्‍यक असलेले ५० व्‍हेंटीलेटर, १० Paediatric व्‍हेंटीलेटर, ०२ लिक्‍वीड ऑक्‍सीजन प्‍लॅंट व १०० Dura सिलेंडर, १०० जम्‍बो सिलेंडर, जीनोम सीक्‍वेसिंग लॅब उभारणी व ऑक्‍सीजन बेडकरीता ऑक्‍सीजन पाईपलाईन या व इतर वैद्यकीय साहीत्‍यांची आवश्‍यकता आहे. तरी वरील कामासाठी इच्‍छुक देणगीदार साईभक्‍तांनी देणगीकामी श्री साईबाबा हॉस्पिटल मो.क्र.८७८८४३८४९१ व जनसंपर्क विभाग मो.क्र.९४०४५९२५९९ या भ्रमणध्‍वनींवर संपर्क करावा. तसेच जास्‍तीत-जास्‍त देणगीदारांनी सढळ हाताने देणगी द्यावी, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.  

Recent News

Donation