Languages

   Download App

News

News

सन २०२२ ची श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका लवकरच साईभक्‍तांकरिता होणार उपलब्‍ध

सन २०२२ ची श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका लवकरच साईभक्‍तांकरिता होणार उपलब्‍ध

December 20th, 2021

सन २०२२ ची श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका लवकरच साईभक्‍तांकरिता होणार उपलब्‍ध

शिर्डी -
          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दरवर्षी श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका प्रकाशित करणेत येत असुन सन-२०२२ ची श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका लवकरच साईभक्‍तांना विक्रीकरिता उपलब्‍ध होणार आहे. तरी साईभक्‍तांनी कुठल्‍याही अपप्रचारास बळी पडू नये, असे आवाहन संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येते आहे.
           संस्थान व्यवस्थापनामार्फत दरवर्षी श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशित करणेत येतात. या दैनंदिनीत श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरातील विविध मंदिरे आणि महत्‍वाच्‍या स्थानांची सविस्‍तर मा‍हिती नमुद करण्‍यात येते. तसेच याव्यतिरिक्त संस्थानमार्फत साजरे होणारे सर्व उत्सव, धार्मिक व इतर कार्यक्रमांची सविस्तर माहिती, संस्थान प्रकाशित पुस्तके / फोटो, ऑनलाईन देणगी, निवासस्थाने व दर्शन आणि आरती नोंदणी करणेबाबत महत्‍वपुर्ण अशी माहितीचा समावेश असलेली वैशिष्टयपूर्ण अशी श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका साईभक्तांना सशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात.
           सन-२०२२ करीता भक्‍तांना उपलब्‍ध करुन द्यावयाच्‍या श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका छपाई करुन प्रकाशित करणेबाबत संस्‍थानमार्फत कार्यवाही सुरू करणेत आलेली आहे. मात्र यावर्षीही कोव्‍हीड-१९ या संसर्गजन्‍य रोगाचे प्रादुर्भावामुळे तसेच काही अपरिहार्य तांत्रिक कारणास्‍तव सन-२०२२ ची श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशनास काहीसा विलंब होत आहे. परंतु संस्‍थानमार्फत दैनंदिनी व दिनदर्शिका भक्‍तांना लवकरात लवकर उपलब्‍ध करुन देणेबाबत प्रयत्‍न करणेत येत असून, साईभक्‍तांनी कुठल्‍याही अपप्रचारांस बळी न पडता सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Recent News

Donation